
प्रभात दर्शन - मराठी चित्रपट सृष्टीचा लखलखता इतिहास
कलांगण, स्वरालय आणि मनमोहिनी क्रिएशन्स निर्मित
कलांगण प्रस्तुत,
सहर्ष सादर करीत आहोत
मान्यवरांनी प्रशंसित केलेला गायन, नृत्य व नाट्याने सजलेला १ दृक्श्राव्य नेत्रदीपक आविष्कार
प्रभात दर्शन - मराठी चित्रपट सृष्टीचा लखलखता इतिहास
खास लोकाग्रहास्तव पुन्हा घेऊन येत आहोत
२६ जानेवारी, सावरकर स्मारक सभागृह, दादर
शिवाजी पार्क, दादर
सायंकाळी ५.३० वाजता
प्रभात चित्रपट कंपनी म्हणजे एक लखलखता रुपेरी पडदा! प्रभातने आपल्याला दिला पहिला बोलपट "अयोध्येचा राजा" आणि त्यानंतर या चित्रपट कंपनीनं मागं वळून पाहिलं नाही. धर्मात्मा, माणूस, शेजारी, कुंकू, रामशास्त्री, तुकाराम, संत सखू, लाखाराणी यासारखे नावीन्यपूर्ण आणि त्या काळातले तांत्रिक दृष्ट्या थक्क करणारे चित्रपट प्रभातने दिले.
तर हाच सुवर्णयोग साधून आम्ही अत्यंत आनंदाने आणि कृतज्ञतेने एका विशेष कार्यक्रमातून प्रभात युगाच्या सुवर्ण स्मृतींना उजाळा देणार आहोत.